अखेरचे हे पान वाहतो अनामिक रसिका
उद्यापासूनी पुन्हा एकदा मुका बनेल मुका
कोसळधारा मिलनाच्या अन कधी विरहवेदना
गोड कळ्यांच्या गंधी विखुरल्या कधी जखमांच्या खुणा
तुझी भावना तुझ्याच शब्दी नाव लाविले फुका
उद्यापासूनी पुन्हा एकदा मुका बनेल मुका
अखेरचे हे पान वाहतो अनामिक रसिका
पुनरपि जननम् पुनरपि मरणम् हर पानी भोगणे
जडमूढ झाले एकरूप-जीव त्यात उमगले गाणे
मी-तू पण माझेच गळाले अलग राहिला तू का?
उद्यापासूनी पुन्हा एकदा मुका बनेल मुका
अखेरचे हे पान वाहतो अनामिक रसिका
