चाफ्याचा सुवास मस्तकात भिनभिनला
अन् तुझ्या सयीने थेट ह्रदयाचा गाभा झिणझिणला
पापणीची पाकळी हलकेच थरथरली
अन् एक लहर आसेतू हिमाचल मोहरली
थरथरणार्या हातात काठी सावरली
पावले हळूच चाफ्याच्या मागावर वळवली
चाफ्याने डवरलेलं झाड .... अनिमिष मलाच पाहात होतं
ओघळणार्या प्रत्येक थेंबात .... माझ मन न्हात होतं
आठवणींचा पाऊस मनसोक्त कोसळला
ओली नजर पिऊन चाफा हरखला, ... बहरला
डोळे पुसताना पुन्हा .....
चाफ्याचा सुवास मस्तकात भिनभिनला
अन् तुझ्या सयीने थेट ह्रदयाचा गाभा झिणझिणला
No comments:
Post a Comment