मन मनी कधी जुळले ना तुला मला कळले
तन झंझारुन आले तरी पाऊल का अडले
मन एकरुप होता सार्या फुकाच बाता
का अट्टाहास आता हातात गुंफ हाता
दव दाटले का नयना तू का ग मुग्ध मौना
प्रिती तुला कळेना कळते परी वळेना
अधुरा तुझ्याविना क्षण एकही विरेना
आता पुरे बहाणा तू संग संग ये ना
तोडून सर्व बंधा होऊन मुक्त गंधा
मनकुसुम हे फुलू दे झुल्यावरी झूलू दे
