Thursday, 16 July 2015

हाक



नाही कुणी उरला वाली
याद तुझी आली देवा __ याद तुझी आली ||धृ||

भोवऱ्यात गरगर फिरते संसाराची नाव
फिरोनिया थकलो देवा आता तरी धाव
मती गुंग झाली माझी __ मती गुंग झाली माझी
आशाही बुडाली
याद तुझी आली देवा __ याद तुझी आली ||||

सांग कोठे लपले पुण्य जगी भरले पाप
जाऊ सांग कोठे देवा तूच मायबाप
तुझ्या दारी घेवून आलो __ तुझ्या दारी घेवून आलो
रिकामी ही झोळी
याद तुझी आली देवा __ याद तुझी आली ||||

माणसाची वैरीण झाली माणसाची जात
पांघरून माणूस फिरतो दानवाची कात
राहिलो मी माणूस देवा _ राहिलो मी माणूस देवा
ही का चूक झाली
याद तुझी आली देवा __ याद तुझी आली||||



No comments: