Wednesday, 28 August 2013

मेरा अक्कलकोटवाला




डर मत मै हुं तेरे पीछे 
ऐसा मेरे कानमें बोला
मेरा अक्कलकोटवाला ..... मेरा अक्कलकोटवाला .....


तन मेरा डोला .. मन मेरा बोला
कण कण से आवाज सुनी हैं
मेरा अक्कलकोटवाला .....


कौन हैं जिसके नाम का सारी
दुनिया में हैं बोलबाला
मेरा अक्कलकोटवाला .....


रब राखा साई राम रहिम भाई
सब में हैं पर सबसे निराला
मेरा अक्कलकोटवाला .....


तेज हैं आंखे .... तेज हैं चेहरा
दिल हैं सिधा ... भोलाभाला
मेरा अक्कलकोटवाला .....

मान ले तू या .... न मान सही हैं
वो ही हैं मेरा .... रखवाला
मेरा अक्कलकोटवाला .....मेरा अक्कलकोटवाला .....

मैत्री

दोन मैतरांची  ... जुनी ही कहाणी
एक राहे गगनी ... दुजा वाहे अवनी

सागराची गाज ... एक आर्त नाद
चंद्रकला सोळा ... सागरास साद
मासी दोन दिसी ... दोघेही उन्मनी
एक राहे गगनी ... दुजा वाहे अवनी

नदी नाले यांचा ... जमवुनिया  मेळा
एक एक बुन्दा ... करोनिया गोळा
निरंतर झेप ...  फेस फुटे वदनी
एक राहे गगनी ... दुजा वाहे अवनी

घालतोय पिंगा ... चंद्रमा अतृप्त
भेट न हो शक्य ... तसा होई लुप्त
विझवुनी दीप ... आकाश सदनी
एक राहे गगनी ... दुजा वाहे अवनी

Saturday, 17 August 2013

बेसूर

मी न विसरलो, तू न विसरली, तरीही हरवले सूर
स्वप्न सांडले काजळमाथी, उरी उरे हुरहूर ||धृ||

झुळझुळणारा वारा होता ते हसणारे पाणी
तुझी न माझी संगत सोबत वारा गाई गाणी
संगतसोबत सरली, उरला डोळ्यांमधला पूर ||||

तीच नदी अन तोच किनारा बसलो त्याच ठिकाणी
तोच शशी अन तसेच तारे तशीच आहे रजनी
तसेच आहे चित्र परंतु बदलून गेला नूर ||||

विरह

पौर्णिमेची रात्र चमचम चमकती या चांदण्या
धुंद आहे रात्र तरीही चांदणे हे मंद का?

चंद्रमाचे चांदणे करी अमृताचा शिडकावा
थंड आहे किरण तरीही तप्त भासे चंद्र का?

रातराणी बहरली अन गंध प्रसवू लागली
भिजुनी गंध बरसाती अंग माझे कोरडे का?

वाहता वारा फुलवितो मनमयुराचा पिसारा
मोरपीस लहरस्पर्श आज वाटे रुक्ष का?

गीत ते अधरांवरी तरी अधर हे अबोल का?
रोज करते मी प्रतीक्षा विरह हा संपेल का?

ठेला

क्युं करते हो झगडा बोलो ||
क्युं करते हो मनमानी  ||
उसीकी रोटी उसीका पानी ||
फिर कहे को खिंचातानी ||

जितनी तेरी भूक हैं  ||
पंछी उतना दाना चुन ||
उडते उडते नाम ले उसका  ||
गाता जा तू हरी की धून  ||

उसने माना बेटा तुझको  ||
ध्यान से उसकी बात तो सुन ||
एक ही तेरी हैं पहचान  ||
उसका बेटा यही हैं गुन ||

बाकी सारा खेल हैं ||
यहा लगा एक मेला हैं ||
ढुंढ सके तो ढुंढ ले उसको ||
उसका एक ही ठेला हैं ||

छकुलं

अले माझ छकुलं दुडूदु़डू धावलं
पकडु मी गेले त्याला मला नाही गावलं ।।ध्रृ।।
             छकुल्याचे गाल .. गोरेगोरे पान
             पाणीदार डोळे .. टपोरे छान
             गालावर खळी कसं खुदकन हासलं
             पकडु मी गेले त्याला मला नाही गावलं ।।१।।
छकुल्याच्या फेट्यामधे मोरपीस खोवले
सारे त्याच्या तालावर थुईथुई नाचले
बोबड्याशा बोलावर सारं जग भाळलं
पकडु मी गेले त्याला मला नाही गावलं ।।२।।
             मुखात घालुन मुठी कशा चोखी
             छकुल्याच्या बाळलीला अशा कोटी कोटी
             मुठीमधे छकुल्याच्या सारं जग मावलं
             पकडु मी गेले त्याला मला नाही गावलं ।।३।।

पापणीत अलगद टिपले

पापणीत अलगद टिपले मुक्या भावनांना
काल तुला पाहीले मी … डाव मांडताना

ओंजळीत मोती बनला तुझा अट्टहास
ना कळले प्रीत ही बनली कधी माझा श्वास
पाहिलेस का तू मजला … श्वास कोंडताना
काल तुला पाहीले मी ......

अव्हेरिले मीच मला मी कोण दिशे जावे
परत पुन्हा मागे वळणे कुणा शक्य व्हावे
कालचक्र पिळते हृदया … उलट फिरविताना
काल तुला पाहीले मी ......

काजळी बने ही वात दिवा लावताना
काळीज हे काळे पडले प्रीत चेतताना
का जळी न मीन मी झालो … दव हे सांडताना
काल तुला पाहीले मी ......

ओसरली लाट कशी ही पुन्हा उसळू पाहे
गीत विरून वाऱ्यावरती मुका उगी राहे
स्वप्न पुन्हा सत्यामधले … स्वप्न लोचनांना
काल तुला पाहीले मी ......

Friday, 16 August 2013

गुरुपदी रमला


जो गुरु पदी रमला ... भवसागरी तरला

दैन्य, दुःख, दारिद्रय ... विळख्याने पिडला
कर्मफला भोगवटा ... कधी कुणा टळला?
जो गुरु पदी रमला ... भवसागरी तरला

रावा भीती लक्ष्मी क्षती ... रंक क्षुधे पिडला
भय हरण्या राव - रंके ...कधी कुणा स्मरला?
जो गुरु पदी रमला ... भवसागरी तरला

मदनबाण काम पीडे ... हृदयी व्याकुळला
कामक्रीडा ध्यास मनी ... कधी कुणा फळला?
जो गुरु पदी रमला ... भवसागरी तरला

मोक्ष मिळे ज्यास तया ... जन्म मृत्यू टळला
मोक्षाचा मार्ग कसा ... कधी कुणा कळला ?
जो गुरु पदी रमला ... भवसागरी तरला



माझे माहेर



कितीक दिसा नाही पहिले स्वामींच्या पाया
अक्कलकोटी जाऊनी येते माहेरी राया ||धृ||


दाटुनी येतो कंठ आठवूनी आईची माया
मोडू नका मागणे तुम्हासी विनवितसे राया ||१||


आतुर झाले नयन कधीचे स्वामी पहावया
पदर पसरुनी भीक मागते तुम्हापुढे राया ||२||


नाम अपुले कोरुनि गेला स्वामी या हृदया
प्राण दाटले कंठी मजवरी कृपा करा राया ||३||


परोपरीने हाक मारीते लेक स्वामीराया
सखा विनवितो दर्शन देवूनी धन्य करा राया ||४||




|| गुरु वंदना ||

प्रथम वंदू आदीगुरू | चल अचलांचा उद्धारु |
भजू तयासी निरंतरू | नमस्कारु ||१||

द्वितीय ज्ञानाचा सागर | सकल सुखांचे आगर |
गुरु ज्ञानदेव ईश्वर |  | नमस्कारु ||२||

तृतीय योगियांचा राजा | विवेकानंद गुरु माझा |
त्याचिया ते चरणरजा | नमस्कारु ||३||

माम जगणे सुसह्य केले | गण गण गणात बोले |
चतुर्थी ते गजाननाले | नमस्कारु ||४||

अनंत रूपे मोजू जाता | एकवटुनी झाली माता |
पंचमी आदिशक्ती आता | नमस्कारु ||५||

विठ्ठले एकरूप झाले | सदेह वैकुंठासी गेले |
षष्ठी तुकाराम आगळे | नमस्कारु ||६|| 

रामकृष्ण परमहंस | हृदयी देवीचा निवास |
सप्तमी तो ईश्वरी अंश | नमस्कारु ||७||

शिवशंकर माझी कात | शिवशंभो बाहेर आत |
अष्टमी सांब नीळकंठ | नमस्कारु ||८||

नवमी सावरली वाट | अन धरिला माझा हात |
जाहले एक नवनाथ | नमस्कारु ||९||

तारीला शैलेंद्र बावरू | ऐसे माझे सकल गुरु |
किर्ती जयांची  दिगंतरू | नमस्कारु ||१०||

स्वीकारोनी मम प्रार्थना | वदविली गुरुवंदना |
ऐषा  श्री स्वामी समर्थांना | नमस्कारु ||११||

Dedicated to "MOTHERS"


                 आई

चालता चालता तीन शब्द ... पडले माझ्या कानी
गोठून गेलो उत्तर ऐकून ... डोळा आले पाणी
पुसत होता कोणी कोणा ... "कशी असते आई"
पुसणाऱ्याला सांगत होती ... कुणी एक बाई

नवजात शिशुसाठी ... गाते अंगाई
शी काढा .. शु पुसा .. आई बनते दाई
बालपणी माई ... तशी कुमारपणी ताई
तरुणपणी शिंगे फुटताच ..... आई वाटते बाई
लहानपणी गोष्टी आणि बालपणी मस्ती
मुले तरुण होतात तेंव्हा .... आई एकटीच द्रष्टी

आई असते घरी तरी नजर खिळली दारी
सुखरूप यावी मुले ... हीच काळजी उरी
भरलेल्या घरात ... कोणी राहते का उपाशी
मुले अजून जेवली नाहीत ... आई वेडीपिशी
सारी सृष्टी मुलांमध्ये ... दृष्टी तिची अटळ
नजरेमधून ओघळ होतात ... जगामधले बदल

दिवस सरतात भराभरा ... मुले होतात मोठी
डोंगराएव्हढी माया तेंव्हा दिसू लागते छोटी
आभाळाची माया सोडून झेप घेतात नभी
परत येईल पाखरू म्हणून आई दारात उभी
दूरदेशी पाखरू ... इथे आई दुःखी कष्टी
कढत अश्रू डोळ्याआड ... शीतल राखी दृष्टी

शेवटी ती म्हणाली ... "एकच तुला सांगते"
"आई जाणण्यासाठी ... पहिले आई व्हावे लागते"
खळकन खळले पाणी ... कसे सांगू बाई 
मनात म्हटले "चुकलीस... आधी गमवावी लागते आई"





|| श्री स्वामी समर्थ - आरती ||



मूळ वडाचे कूळ सांगोनी जगता उद्धारी ||
त्या पतितपावन नरसिंहाचे ध्यान मनी मी धरी ||धृ||

कामक्रोधमदमत्सरमाया बसलो कवटाळूनी
धूडकावूनी तुज नाम न घेई म्हणे मीच ज्ञानी
अज्ञानी मी पाप करी .. परी क्रोध न मजवर धरी
त्या पतितपावन नरसिंहाचे ध्यान मनी मी धरी ||||

निर्मळ भक्ती मला जमेना कशी करू प्रार्थना
संसाराचा मोह सुटेना कशी करू अर्चना
भान हरपले भवसागरी तरी उचलुनी मजला धरी
त्या पतितपावन नरसिंहाचे ध्यान मनी मी धरी ||||

सरस्वतीची वीणा मंजुळ कवन तुझेच करी
स्वामी समर्था तुझ्या पाऊली लक्ष्मी येई घरी
गौरी हर हर हरण करी मम दुःखाचे झडकरी
त्या पतितपावन नरसिंहाचे ध्यान मनी मी धरी ||||

गौरीनंदन गण गण गणपती मोहक नृत्य करी
डम डम घण घण शंखनाद जणू अनंत वाजे ऊरी
उदे उदे जगदंबा माते हृदयी वास करी
त्या पतितपावन नरसिंहाचे ध्यान मनी मी धरी ||||




ईश्वर



ईश्वर एक आस हैं
ईश्वर एक प्यास हैं
ईश्वर एक एहसास हैं

ईश्वर एक साधना हैं
ईश्वर उपासना हैं
ईश्वर आराधना हैं

ईश्वर कभी नारी हैं
ईश्वर कभी कुमारी हैं
ईश्वर कभी बुढ्ढा हैं
ईश्वर कभी बच्चा हैं
झूठे के लिये अच्छा हैं
अच्छे के लिये सच्चा हैं

ईश्वर एक दर्पण हैं
ईश्वर एक अर्पण हैं
ईश्वर समर्पण हैं

ईश्वर बहोत प्यारा हैं
ईश्वर सबसे न्यारा हैं
उसे पाना एक मजा  हैं
उसे पाना कभी एक सजा हैं

ईश्वर एक मेल हैं 
ईश्वर एक खेल हैं
सारी दुनिया बंद हैं जिसमे
ईश्वर ऐसी जेल हैं



सपना



पागल थे हम तुम को कहते थे अपना |
समझे थे कोई सलोनासा सपना |

न हम सह सके दर्दे दिल ऐ हसीना |
न हम कह सके दिल ऐ ख्वाइश ओ तमन्ना |

मगर एक दिन हमने हिम्मत बनाई  |
मोहब्बत कि फरियाद तुमको सुनाई |

बहोत देर कि जब ये तुमने सुनाया |
अपना तो सपनाही निकला पराया  |

सपना न टूटा मगर हम तो टुटे |
किसीने न लुटा मगर हम तो लुटे |

अब भी ये सपना न लगता बेगाना |
सपना तो अपना था अपना बस सपना |




पाऊस


कोसळणाऱ्या पावसाला मी म्हटले थोडे थांब
दोन मिनिटात धारा पाडून जाऊ नकोस लांब

बालपणी फसवत होतो देऊन पैसा खोटा
राग येवून नेहमी नेहमी बरसायचास तू मोठा

मोठे झालो आम्ही .. खिशात खेळतोय पैसा आता
खोटा नाही खरा दिला म्हणून झालास छोटा?

कामे आमची होत नाहीत दिले जरी पैसे
लागण झाली तुला याची ... झाले ऐसे कैसे?

खोटा पैसा देतो माझे लहानपण आठव
सरीमागून सरी पाठव थोडे मन भिजव




विठ्ठल



जगात विठ्ठल भरला
विसरला विठ्ठल विठ्ठला

काय विठ्ठलासी उपजे
ऐसे कैसे हे जग निपजे
एका विठ्ठलाचे पोटी
सारे विठ्ठलची होती
कैसा विठ्ठल बदलला
विसरला विठ्ठल विठ्ठला ||१ ||

सारे विठ्ठल येता भेटी
नेती लाठी काठी हाती
विठ्ठल आनंदाचा डोह
बनला दुःखाचा व्यामोह
कैसा विठ्ठल बदलला
विसरला विठ्ठल विठ्ठला ||२||

विठ्ठल हसतो विठ्ठलासी
रडवितो विठ्ठल विठ्ठलासी
विठ्ठल विनवी विठ्ठलासी
बनवी विठ्ठल विठ्ठलासी

जीवन




ढग वाहून नेता नेता वाऱ्याला एकदा दम लागला
तो थकलाझाडाच्या सावलीत बसून पानांशी खेळू लागला

बराच वेळ झालाढग एका जागी उभा राहून कंटाळला
रागाने फुलू लागला,हळूहळू विस्तारत मोठा झाला

तो वाऱ्यावर गुरगुरू लागला, ..... वारा चिडला
वाऱ्याने चिडून उडी मारलीढगाच्या पोटात ढुशी मारली

ढग कळवळला ... आक्रोश करत रडू लागला
तो खूsssप रडला आणि रडून रडून हलका झाला

पाऊसपाणी पिऊन वारा ताजातवाना झाला
रिकामी ढग वाऱ्याने क्षितिजापार नेला

ओले झाड हसत टाळ्या वाजवू लागले
त्याला जीवन मिळाले ते सळसळत नाचू लागले


पगला



मैं पागल मेरा ईश्वर पागल .. पागल मेरा प्यार ||
पागल कोई नही हैं फिर भी .. पागल हैं संसार ||

पागल मां हैंबेटा पागलभाई बेहेन पागल
पागल बाप कि बेटी पागल सगे भी हैं पागल
पागलपन में सब हैं सियाने .. कहते मैं पागल
सच मैं पागल ईश्वर पागल ... पागल मेरा प्यार ||

धन दौलत के लिये हैं पागल धनावानोंकी भीड
सलाम करते झुकते रहते कहा हैं इनकी रीड
मैं ना चाहू हिरे मोती कहते मी पागल
सच मैं पागल ईश्वर पागल ... पागल मेरा प्यार ||

औरत कोई चाहे .. दुजा चाहता हैं अधिकार
कोई बना हैं साधू कोई साधू का सरदार
रहना चाहु मनुष्य तो वो कहते मैं पागल
सच मैं पागल ईश्वर पागल ... पागल मेरा प्यार ||

पंक में डुबकी मार के सुंदर बन जाते हैं वीर
दुःख के सागर गोते खाके कई बने हैं पीर
मन को राखू साफ तो फिर भी कहते मैं पागल
सच मैं पागल ईश्वर पागल ... पागल मेरा प्यार ||