Wednesday, 11 November 2015

काळजी



जीव टांगून ठेवला वरी
अन खिलली नजर दारावरी
अवं कारभारी  ssss अवं कारभारी
कवा येताय माघारी
.... कवा येताय माघारी

बा रे समिंदरा तुजी गाज
त्यास मिलो माजा आवाज
सांग राखून लेकीची लाज
का रं उशीर जाला आज
अवं कारभारी  ssss अवं कारभारी

ऐक भाऊराया माजी साद
होरी माज्या दिशेन हाक
नको फिरवू रं तुजी लहर
नको करू तू काही कहर
अवं कारभारी  ssss अवं कारभारी

दिस सरला ssss सांज निमाली
रात पुनवेची ssss चांदात न्हाली
जाली डोल्यात गोला मासोली
उरी मारती टपटप खाली
अवं कारभारी  ssss अवं कारभारी



No comments: