नाही
कुणी उरला वाली
याद
तुझी आली देवा __ याद तुझी आली ||धृ||
भोवऱ्यात
गरगर फिरते संसाराची नाव
फिरोनिया
थकलो देवा आता तरी धाव
मती
गुंग झाली माझी __ मती गुंग झाली माझी
आशाही
बुडाली
याद
तुझी आली देवा __ याद तुझी आली ||१||
सांग
कोठे लपले पुण्य जगी भरले पाप
जाऊ
सांग कोठे देवा तूच मायबाप
तुझ्या
दारी घेवून आलो __ तुझ्या दारी घेवून आलो
रिकामी
ही झोळी
याद
तुझी आली देवा __ याद तुझी आली ||२||
माणसाची
वैरीण झाली माणसाची जात
पांघरून
माणूस फिरतो दानवाची कात
राहिलो
मी माणूस देवा _ राहिलो मी माणूस देवा
ही का
चूक झाली
याद
तुझी आली देवा __ याद तुझी आली||३||