Sunday, 12 November 2017

मागणे

श्रीगुरु यती मम दुःख जडावे
ऐसे कर्म न कधी घडावे
चरण तुझे मज नित्य स्मरावे
नित्य असे मागणे ।।

सुख दुःखाचा तूच नियंता
कर्ता मी न च, तूच करविता
कोरा कागद करूनी माथा
चरणी तव विरवणे ।।

सदा सर्वदा चंचल वृत्ती
संभ्रमित मती पोखरली स्मृती
डळमळीत मन विचलित चित्ती
तळमळणे शमविणे ।।

अंश पांगले विश्व विखरूनी
दंगल उसळे अहं-करोनी
मी-तू पणाची दरी सांधूनी
विलगपणा निरवणे ।।

अवचित अघटीत अतर्क्य बदलुनी
अगम्य जीवन सुरम्य घडवुनी
अमित सुखाचे घट पाजवुनी
अगमा-निगमा मिटवणे ।।

Wednesday, 13 September 2017

नरसिंह

वीज कोसळे तद्वत प्रगटे नारायण अविलंबी
प्रह्लादाकारणे अवतरे नरसिंह स्तंभी

दिस असोनी दिस असेना
रात म्हणावी रात दिसेना
ऐषा सायंप्रहरी वधिला हिरण्यकश्यपू दंभी
वीज कोसळे तद्वत प्रगटे नारायण अविलंबी

जारज अंडज स्वेदज ऊद्विज
नाही जन्मला बनूनी वंशज
कडकड खांबा प्रसवूनी वधिला हिरण्यकश्यपू दंभी
वीज कोसळे तद्वत प्रगटे नारायण अविलंबी

देव न दानव, पशू न पक्षी
रूप न धरिले किन्नर यक्षी
सिंहमुखी नरदेही वधिला हिरण्यकश्यपू दंभी
वीज कोसळे तद्वत प्रगटे नारायण अविलंबी

ना धरती अन नाही अंबरी
घरात नाही, न घराबाहेरी
उंबरठी मांडीवरी वधिला हिरण्यकश्यपू दंभी
वीज कोसळे तद्वत प्रगटे नारायण अविलंबी

पंचतत्व ना तंत्र न मंत्रा
ना धरी हाती शस्त्र न अस्त्रा
निव्वळ  हस्तनखाग्री फाडिला हिरण्यकश्यपू दंभी
वीज कोसळे तद्वत प्रगटे नारायण अविलंबी

प्रार्थनेत, वर मागण्यात जरी
बुद्धी, युक्ती तू कितीही वापरी
हर घड़ी हर पल तुजवरी भारी, श्रीहरी हिरण्यगर्भी
निव्वळ  हस्तनखाग्री फाडिला हिरण्यकश्यपू दंभी
वीज कोसळे तद्वत प्रगटे नारायण अविलंबी
प्रह्लादाकारणे अवतरे नरसिंह स्तंभी


Thursday, 13 July 2017

ओलेती



सर्र सर्र थरारून
सरीवर सरी आल्या
तुझ्या भवती धरला
फेर नाचत नाचत

तुला ओलेती पाहून
पाऊस खुळावला
अन थांबून राहिला
तुला पहात पहात

त्वचा नितळ स्पर्शून
तोही झाला चिंब ओला
सरसरत शिरला
तुझ्या कुशीत कुशीत

घराकडे वेगेवेगे
जशी पाऊले ऊचली
झोड लावून पाऊस
चारी दिशांना झाकोळी

चेकाळल्या पावसाची
वारा पाही झोंबाझोंबी
भर्र भर्र भरारून
वारा झोंबे थेंबाथेंबी

वारा पावसाची झुंज
हवा झाली कुंद कुंद
थरथर तुझी वेल
अंगी कंपित कंपित

क्षितीजापल्याड नेले
काळे नभ ढकलून
जिंकला ग बाई वारा
पावसाशी झगडून

वारा फुंकर घालून
दूर करी ओलेपण
त्याच्या स्पर्शाने मिटली
तू ग लाजून लाजून
तू ग लाजून लाजून


Monday, 15 May 2017

फुलपाखरू

असता नसता ऋतूवर वर्षा मलमली पंख मी ल्यावे
फुलपाखरू बनुनी फिरावे दोनच दिवस जगावे

बनण्या पाऊस थेंबा उडूनी आकाशास भिडावे
अलगद उतरून पानावरती दवबिंदू व्हावे
फुलपाखरू बनुनी फिरावे दोनच दिवस जगावे

रवीकिरणाच्या शिडीवरूनी कवेत नभ घ्यावे
वीज बनुनी कोसळून मग धरतीस मिळून जावे
फुलपाखरू बनुनी फिरावे दोनच दिवस जगावे

कधी पतंगा बनून ज्योतीसह झिंगावे पिंगावे
प्रणय भावने झेप घेऊनी क्षणात संपून जावे
फुलपाखरू बनुनी फिरावे दोनच दिवस जगावे


1 मे 2017

स्वप्न-गंधा


चेहर्‍याची गोलाई
डोळ्यांची गहराई
नजरेतील स्निग्धता
मिलनाची अधीरता

रोखून पाहता तू
गात्रांची दाणादाण
थेट रूतून बसतो ना
ह्रदयात  मदनबाण

भिवईची तलवार
भारी धारदार
हलकीशी हालचाल
थेट काळजावर वार

काळ्याभोर डोळ्यांच्या
बदामी चंद्रज्योती
देवघरात तेवणार्‍या
मंद मंद वाती

पापण्यांची फडफड
त्यात लुकलुकत्या चांदण्या
ह्रदयाची धडधड
वाढवतात देखण्या

लाजेचा शृंगार
ल्यालेले गाल
ओठांच्या कडेला
दातांची चाल

जास्वंदी ओठांवर
लालचुटुक जिवणी
हलकेच फिरता होते
ह्रदयाची चाळणी

अशा तुझ्या अदांनी
घायाळ होऊन मी
कैद झालो कधीचा
आता तुझा गुलाम मी

Sunday, 16 April 2017

दाम करी काम

दामाजीचे गुलाम सारे माहित होते मला
तू प्रेमाचे मोल अलौकिक का सांगितले मला

मीठ भाकरी मिळवून खाऊ
पांघरूनी नभ सुखात राहू
अशा तुझ्या त्या शब्दामधुनी झालो नादखुळा
तू प्रेमाचे मोल अलौकिक का सांगितले मला

फुलपाखरू चुंबून वदले
तुझ्यात माझे विश्व वसले
मधु संपता गेले उडूनी शोधित नवीन फुला
तू प्रेमाचे मोल अलौकिक का सांगितले मला

सत्ययुगी ते सत्य संपले
शब्दही कवडीमोल जाहले
विकले जाते एकजीव मन आज समजले मला
तू प्रेमाचे मोल अलौकिक का सांगितले मला


गाणे

गंधीत होऊनी आले गाणे
मधुर स्वरांचे मधुर तराणे

भुलवून स्वरांना तू बांधले
गळ्यामधूनी हळू सोडले
मधाळ ओठी मग घोळले
श्वासांवरती स्वार होऊनी
गंधीत होऊनी आले गाणे
मधुर स्वरांचे मधुर तराणे
गंधीत होऊनी आले गाणे

कधी आरोही, अवरोही मग
कधी तान आलापीचे जग
स्वर, लय मात्रा वर्षती पग पग
त्या बरसाती चिंब न्हाऊनी
गंधीत होऊनी आले गाणे
मधुर स्वरांचे मधुर तराणे
गंधीत होऊनी आले गाणे


गीत

लड़का :
तेरे कजरे ssss की धार
हो गया दिल ये तार तार
घायल दिल की पुकार
ले तेरा नाम बार बार

लड़की :
कोमल नजरों की ये धार
कैसे करेगी दिल पे वार
तेरे दिल की पुकार
क्यूँ ले नाम बार बार


लड़का :
चोट गहरी प्रेम पीडा .. मुश्किल है सहाना
मुश्किल है एक दुजे बीन   .. जीना हो या मरना

लड़की :
सैंया मै समझ गयी ...  ये तेरा बहाना
मीठे मीठे बोल असली ... बात को छुपाना

लड़का :
दिलबर कर लेना इकरार
तुम बिन सब कुछ है बेकार
सच सच कह दे ना मेरे यार
तू भी करती है ना प्यार

लड़की :
मैं तो करती हूँ इनकार
तेरी कोशिश है बेकार
क्यूँ कहता है मुझ को यार
मैं क्यूँ करूँगी तुझे से प्यार



लड़का :
नेक है इरादा मेरा ... कैसे समझाऊं मैं
दिल का तार छेड़ा तूने .. झनझना रहा हूँ मैं

लड़की :
नीयत में खोट है तेरी ... चला जा रे झूठे
सच्ची कह दे इसी बात में ... कितने दिल यूँ लुटे

लड़का :
तेरे कजरे ssss की धार
हो गया दिल ये तार तार
घायल दिल की पुकार
ले तेरा नाम बार बार

लड़की :
कोमल नजरों की ये धार
कैसे करेगी दिल पे वार
तेरे दिल की पुकार
क्यूँ ले नाम बार बार



Saturday, 25 March 2017

नजर

नको पाहू तू रोखून नजरेला
लाली लाजेची पसरली गालाला

रात्र पहिली ... पहिला प्रहर
खिळली खट्याळ, तुझी रे नजर
झुकली पापणी, मनी थरथर
अंगी भिरभिरली ... लहर ... लहर
मोरावाणी पिसारा फैलावला
लाली लाजेची पसरली गालाला
नको पाहू तू रोखून नजरेला

खंजिरी नजर ... घाव गहिरा
मिटल्या डोळ्यातून काळजाला भिडला
टक लावून, नको ना रे पाहू तू
ठिणगी इश्काची आत नको लावू तू
ऊरी धडधड ... अंगी कंप सुटला
लाली लाजेची पसरली गालाला
नको पाहू तू रोखून नजरेला


Sunday, 19 March 2017

डाव मांडू दे


तुझ्यासवे मांडू दे ना डाव नवा .. डाव नवा
तुझी आस लागली रे माझ्या जीवा .. माझ्या जीवा

असताना साथ तुझी ... जगण्याला अर्थ नवा
मन माझे वेडेपिसे ... सोबतीला तूच हवा
तुझे बोल माझ्या कानी वाजविती मधुर पावा
तुझ्यासवे मांडू दे ना डाव नवा .. डाव नवा
तुझी आस लागली रे माझ्या जीवा .. माझ्या जीवा

तुझ्यामुळे सावरला ... जीवनाचा झंजावात
मन गर्भी अंकुरली ... प्रितीची ही रुजवात
नाही कळले, घेतला तू, काळजाचा कधी ठावा
तुझ्यासवे मांडू दे ना डाव नवा .. डाव नवा
तुझी आस लागली रे माझ्या जीवा .. माझ्या जीवा

तुझ्या माझ्या प्रितीचा ... होऊ देत गवगवा
कोण किती काय बोले ... नाही तमा नाही पर्वा
माझ्या आभाळात उडे तुझ्या स्मृतींचाच थवा
तुझ्यासवे मांडू दे ना डाव नवा .. डाव नवा
तुझी आस लागली रे माझ्या जीवा .. माझ्या जीवा



Wednesday, 8 March 2017

तू ही तो है


तूही मेरी ... आरजू
तूही मेरी ... जूस्तजू
तूही मेरी ... गुफ्तगू

मेरे मन की गुंज
तू ही तो है
तू ही तो है

तेरा रहना .. दिलमें मेरे
कभी रहना .. दिल से परे
तू बवंडर .. दिल मे फिरे
तब मचला .. दिल क्या करे

दिल की कश्ती .... का किनारा
तू ही तो है
तू ही तो है

मै भंवरा .. था आवारा
मै बादल . था नाकारा
फिरता था .. मारा-मारा
मिला प्यार का .. आसरा

इस गम ए दिल .... का सहारा
तू ही तो है
तू ही तो है


Sunday, 12 February 2017

बासरी


कालिंदीतटी कृष्ण मुरारी वाजवितो बासरी
आनंदाने उसळून येती कालिंदी लहरी

रवंथ करती गायी किनारी टवकारूनी कान
श्रवण करोनी होती सचेतन काळे पाषाण
गोप गोपिका शिल्प जाहले स्मृती भ्रंश होऊनी
कालिंदीतटी कृष्ण मुरारी वाजवितो बासरी

झाडावरचे स्तब्ध जाहले एक एक पान
पक्षी स्थिरावे फांदीवरती ऐकून मंजूळ तान
माथ्यावरचे मोरपीस मग डुलले मोहरूनी
कालिंदीतटी कृष्ण मुरारी वाजवितो बासरी

दाह रवीचाअलगद साहुनी नभ पांघरती दुलई
हरी दर्शना रवीकिरणांनी छेदियली निळई
क्षणभर बासरी वादन ऐकून किरण विरे चरणी
कालिंदीतटी कृष्ण मुरारी वाजवितो बासरी

अधर हरीचे हळूच चुंबिती बासरीचे ओठी
मधुर स्वरांची माळ उमटते बासरीचे पोटी
नादामधुनी कणा कणातून कृष्ण कृष्ण विस्तारी
कालिंदीतटी कृष्ण मुरारी वाजवितो बासरी



रात

क्यूँ मुसाफिर बन के रोज रात आती है।
जरा जरा सी ठहर के क्यूँ रात जाती है।।

दिन क्यूँ होते है .. लंबे लंबे .. साँस कहती है।
एक छोटेसे .. पल का कटना .. कितना मुश्किल है।
शाम की पहरेदारी .. सहना जादती .. हो जाती है।
जरा जरा सी ठहर के क्यूँ रात जाती है।।

चांद भी रूठके .. हर रोज .. तुकडा कम होता है।
एक दिन रूठके .. चेहरा भी .. छुपा देता है।
फिर कही एकही बार पूरी रात .. ठहर जाती है।
जरा जरा सी ठहर के क्यूँ रात जाती है।।

शिकायत भी करे .. तो भला .. किससे करे।
रुठ के और .. जल्दी जल्दी .. वो जाया न करे।
मिलन की प्यास भी .. अधुरीसी .. ही रह जाती है।
जरा जरा सी ठहर के क्यूँ रात जाती है।।



प्यारे ईश्वर

प्यारे ईश्वर,

होके मायूस तेरे दर से आज हम निकले
बेवफा तुम नही मगर बदनसीब हम निकले

तेरे दरस तरसे, घर से प्यासे हम निकले
तेरा दिदार न हुआ, बदनसीब हम निकले

कई दिवाने तेरे .. शामिल होने हम निकले
श्वापदो से परे रहे .. बदनसीब हम निकले

दिल के चोरी की शिकायत दर्ज करने हम निकले
दिल लगाया चोर से ही, बदनसीब हम निकले  

खुश रहे तू ... दुवा मांगने हम निकले
खुशी का रास्ता भुले, बदनसीब हम निकले

इश्क की आग मे खाक हो के हम निकले
राख से हो बेखबर तुम, बदनसीब हम निकले


Monday, 9 January 2017

वृद्धा



मालवू दे ज्योत आता, हीच आस दाता
थकलेली वात म्हणे, दिवा बदल आता

कापसात जन्मले मी, वळून बनले वात
जळणे हे माझे नशीबी, तेल जरी साथ

कृष्णसमयी पेटविता मीच दिला हात
चिरण्याला अंधारा, पेटले मी आत

रात्र फक्त माझ्या नशीबी, दिवस अंधारात
किती दिस आले गेले, संपेना रात

काजळीत काजळोनी का जळावे आता
मालवू दे ज्योत आता, हीच आस दाता


गीत



तुझ्या मुक्या भावनांना शब्दरूप घेऊ दे
छेडता तू तार मला गीत तुझे होऊ दे

खुळ्यापरी मांडियेला मनाचा पसारा
जरी करी धिंगाणा तो फुलवुनी पिसारा
तुझा ताल मिळूनी त्याला नृत्यमग्न होऊ दे
छेडता तू तार मला गीत तुझे होऊ दे

लक्ष तुझे तुला ठावे तूच माझे लक्ष
नादावल्या भावनांना नको कुणी  साक्ष
चाल तुझी वाट तुझी साथ मला येऊ दे
छेडता तू तार मला गीत तुझे होऊ दे


ओ रामजी

रामभक्त हू, मै भी, भले ही ... नही हू मै हनुमान
दो दिन का है काम मुझे, तुम मिलवा दो ना राम

कई दिनोंका  भूका हू मै, निकल रही है जान
तुकडा रोटी मिले तो मेरा बन जायेगा काम
रामभक्त हू, मै भी, भले ही ...

रोटी मिली तो, कल की चिंता मे अटके है प्राण
जेब है खाली, भरवा दो जी जेबमे थोडे दाम
रामभक्त हू, मै भी, भले ही ...

पैसे से क्या होता, सर पर खुला हुवा आसमान
घर मिल जाये, सुकून से फिर लेंगे राम का नाम
रामभक्त हू, मै भी, भले ही ...

छोटा सा घर, क्या है काम का, बंगला दे दो जी
खाली बंगला रूखा रूखा, सामने हो गाडी
रामभक्त हू, मै भी, भले ही ...

ये सब मेरा, अंश भी इसका ना कोई मांगे
दुःखी हू सोच के अब बच्चोंका क्या होगा आगे
रामभक्त हू, मै भी, भले ही ...

दुगना तिगना कर दो रामजी, रख कर मेरा मान
नही चाहिये जादा कुछ बस, छोटासा वरदान
दो दिन का है काम मुझे, तुम मिलवा दो ना राम
बाद मे रख लो राम तुम्हे जब, बन जाये मेरा काम

रामभक्त हू, मै भी, भले ही ...नही हू मै हनुमान
दो दिन का है काम मुझे, तुम मिलवा दो ना राम