|| श्री स्वामी समर्थ ||
नृसिंहाचे रूप प्रगटे कर्दळीवनी |
निर्गुणाचे गुण स्वामी सगुण निर्गुणी ||
अजन्मा जन्मा येई या जनामनी |
जन्मोजन्मीच्या जन्मा जगावे या जन्मी ||
अरुपाचे रूप स्वामीरूपे प्रसावोनी |
विरूपाच्या रूपा केले अरूप स्वरूपिणी ||