साई सुट्टयो छापा काटा
तुझ्यावरती डाव आता
लपंडाव अन चोर पोलीस
कधी रंगे डब्बा ऐसपैस
खांब खांब खांबोली
चला फोडू लगोरी
काचापाणी खेळ मांडू
चला खेळू विटी दांडू
तळ्यात मळ्यात दगड का माती
सागरगोटे उडू लागती
कधी मारू दोरीच्या उड्या
झिम्मा बसफुगडी आट्यापाट्या
सापशिडी व्यापार डाव
जुने दिवस आठवू राव
जुने दिवस आठवू राव