Monday, 31 March 2014
Monday, 17 March 2014
आत्मप्रकाश
मोकळे
आकाश आकाश
भरला
प्रकाश प्रकाश
वर
आभाळाच्या भाळी
विणली
प्रकाशाची जाळी
त्यात
अडकले मन
झाले
उन्मन उन्मन
ऐशा
उन्मनी जीवनी
चाले
संसार संसार
पाश
संसाराचा दाट
होई
अंधार घनदाट
भेदी
अंधाराच्या भिंती
आत्मप्रकाश
प्रकाश
ऐसा तो
आत्मप्रकाशी
विरे
मोकळ्या आकाशी
सखा
म्हणे माझे मन
मोकळे
जरी अडकून
आस
सांग तुला लागली कशाची आस
सख्या असा होऊ नको तू उदास
मनाचा खोटेपणा मोठा न्यारा
मांडून बसतो संसार सारा
मिरवीत बसतो आपुला तोरा
जागेपणी धरी स्वप्नांची कास
सख्या असा …
नात्याचा गोता किती सांगू मोठा
जोडीत बसतो फाट्याला फाटा
गुंतवळा जैशा सागरी लाटा
कर्दमी शोध तू कमळाचा वास
सख्या असा …
सख्या असा होऊ नको तू उदास
मनाचा खोटेपणा मोठा न्यारा
मांडून बसतो संसार सारा
मिरवीत बसतो आपुला तोरा
जागेपणी धरी स्वप्नांची कास
सख्या असा …
नात्याचा गोता किती सांगू मोठा
जोडीत बसतो फाट्याला फाटा
गुंतवळा जैशा सागरी लाटा
कर्दमी शोध तू कमळाचा वास
सख्या असा …
Subscribe to:
Posts (Atom)
