कळते मला ...
... अधूनमधून
... तुलाही माझी आठवण येते
... ह्रदयात एक गोड कळ उमटते
... पण तरीही तू स्तब्ध .. निःशब्द ..
तुला कसे जमते रे
... ह्रदयाच्या फुललेल्या पाकळ्या
... मिटवून बसणे
... सर्व रंगांनी लिप्त होऊन
... पुन्हा अलिप्त होणे
समोरच्याला दिसते
... शांत जलाशयात ...
खळखळून वाहणारे पाणी
आणि तो पडतो ... संभ्रमात
... हा ओढा आहे का तलाव
... रंगांत न्हालेले फुलपाखरु
... सुरवंटाच्या आवरणात
... की सुरवंटाने केलाय
... फुलपंखांचा बनाव
कळते मला ...
... अधूनमधून
.. एका फसव्या क्षणी तूही अडकतोस
... चकव्यात ...
शरीराचा पुतळा डोळ्यातून क्षीण बोलतो
... क्षणभर ..
आणि पुन्हा तू स्तब्ध .. निःशब्द
No comments:
Post a Comment