खेळताना लपंडाव बसतो मी लपून ...
तिच्यासंगे बालपण जपलय मी अजून ...
पकडापकडी, घसरगुंडी, झोपाळ्यावर झुलू
सीसाॅवरती बसून कधी वर खाली डोलू
अटकमटक, बागेत भटक .. जातो जरी दमून
तिच्यासंगे बालपण जपलय मी अजून ...
खोटा खोटा बाहेरुन मी घरात येतो
तिच्या हातचा ताजा ताजा चहाही पितो
भातुकलीचा स्वयंपाक मग आग्रहाने जेवून
तिच्यासंगे बालपण जपलय मी अजून ...
कधी ती आई होते मी तिचं बाळ
कशी कोण जन्माची जुळलीय ही नाळ
कधी तिच्या मांडीवर जातो मी निजून
तिच्यासंगे बालपण जपलय मी अजून ...

No comments:
Post a Comment