Tuesday, 31 December 2013

मिलन



तनी माझ्या झिंगु लागे बासरीची धून
तुझ्या माझ्या मिलनाची ओळखली खूण

बघ सांज वेळी ....
हवा धुंद धुंद झाली ....
फिरवुनी वारा गेला .... मोरपीस गाली
त्याने माझ्या कानी गोड केली गुणगुण
तुझ्या माझ्या मिलनाची ....

गर्द रानवेली ....
सर्द पाने फुले झाली ....
उंच झोलावून मन .... निघाले आभाळी
चांदणीने  माझ्या कानी केली रुणझुण
तुझ्या माझ्या मिलनाची ....


Sunday, 29 December 2013

आहट

तेरे कदमो की आहट
देती दिल को हैं राहत
कोई हैं आसपास
कोई हैं खास खास

ना दिखना तेरा           
शिकायत ना हैं
दिल को समझाया ये
शरारत सी हैं

मन की झंकार ने मगर    
मजबूर कर दिया
मचले अरमान            
कदमो को बहका दिया

तेरी गलियोमे ढुंढा
दरस ना मिले
बस इसी गम से हम
मय में डुबे चले


विठ्ठल


माझ्या विठ्ठलाची गोडी ||
अणू रेणू ब्रम्ह फोडी ||
सखा डूम्बोनिया न्हाई ||
ज्ञान ओथम्बुन वाही .. ज्ञान ओथम्बुन वाही ||||

पाप पुण्या घेवोनिया ||
देवाजीच्या दारी आले ||
पुण्य रोकड्यात नेले ||
पाप सांगा काय केले .. पाप सांगा काय केले ||||

ऐष केली ऐसी जिवा ||
परी रोकडा संपला ||
दुःख लागले पाठीशी ||
काही उरे न गाठीशी .. काही उरे न गाठीशी ||||


सखा म्हणे पाप पुण्य ||
दोन्ही नको माझ्या गाठी ||
तुझे नाम गोड गोड ||
सदा राहो माझ्या ओठी .. सदा राहो माझ्या ओठी ||||



Tuesday, 3 December 2013

स्त्री

ज्या देशाने स्त्रीला माता म्हणून गौरवली
त्याच देशात माझी व्यथा जन्माला आली

लग्नानंतर नवरा गेला म्हणून मला जाळली
माझी व्यथा कुणालाच नाही का कळली?

पुढे समाज सुधारला .... देशही पुढारला
स्वतःला अहिंसावादी मानू लागला

नवनवीन कल्पनांचा उदय झाला
आता नवराच मला जाळू लागला

समाज कधीकधी हळहळला
अधूनमधून टिपेही गळू लागला

कुणी विधानसभेत, लोकसभेत आवाज उठवला
पण अखेर वाहत्या वाऱ्यावर तोही विरला

शेवटी मीच निश्चय केला
लग्नाला ठाम नकार दिला

आता मात्र हद्द झाली ... नकार दिला
..
म्हणूनही माझी राख झाली


तात्पर्य एव्हढेच कि ........
समाज सुधारला तरी छळणे काही संपले नाही
मी काहीही केले तरी जळणे काही संपले नाही 


Monday, 4 November 2013

लावणी



चांदव्याची साथ
अशी मोहरली रात
थरथरली ही कात
काही उमंगना

करी मला वेडी खुळी
कलेजाचा गेला बळी
रुते गालाची ही खळी
घाव सोसना

झुळूमुळू स्पर्श झाला
टोचे लाजेचा हा भाला
ज्वर अंगाला भिडला
ज्वाला साहीना

इश्क नागीण डसली
धुंद नजर जहाली
तटतटली ही चोळी
विष भिनताना

तुझ्या मिठीत निमाले
प्रेम रसात नहाले
श्वास धुंदोनिया आले
पाते लवताना



Friday, 25 October 2013

लावणी




पवन बेधुंद, फुले आसमंत, तू रे का एकला
तोडूनी हे बन्ध होऊन निर्बंध, जवळ घे मला


केसात केवडी गंध
जाहला श्वास हा मंद
या ऊरी दाटली चोळी
देहात पेटली होऴी
तन कष्टी विझव रे ज्वाला
राजसा जवळ घे मला


घायाळ मदनबाणांनी
सरसरली वेदना मनी
तगमग तगमग या तनी
वणवण फिरते उपवनी
शोधिते कुठे तू लपला
साजणा जवळ घे मला



Monday, 14 October 2013

Why Ventura?

On Thursday, 10th October, while returning home, I was thinking about 14th October – a Ventura day. How to tell people about “what is Ventura?” ... And few lines were born in my mind. What is Ventura? It is a group of masters in various fields. The poem is addressed to PROSPECTS informing about these masters and asking the prospects to join Ventura as Clients, Business Partners, Employees. I apologize, if any of the masters is missed in the poem.

Ventura में कौन है                             दिग्गजोकी फौज है
एक से बढकर एक यहा पर                   हर दिन यहा पे मौज है

BKG के Chart का जादू                      क्या कमाल है दे धमाल है
Institution और Currency Market      भरत शहा तो बेमिसाल है

D P सिंग के Legal view पे                 कही कोई सवाल नही
गुरव Sir के Accounting का                कही कोई बवाल नही

विनीत का Research चढती कमान     लक्षभेद करे अर्जुन समान
नितीन त्रिवेदी Expert in Hyper          Back Office में मिठी शक्कर

Marketing का अलग है फंडा                Client पकडना इनका धंदा
Ideas का गाडे झंडा                            विनय पंजाबी रुपया बंदा

Commodity में रामास्वामी                Sindabad the Sailor है
जुझर Sir का Wide Knowledge        Mutual Fund का Pillar है

सबके पीछे सदा रहा है                         साजीद Sir का हौसला
इसी के बल पे खडा रहा है                     Ventura का घोसला

HM Sir का Future Vision                  Pointer अपनी शान है
HM Sir का हसमुख चेहरा                    Ventura की जान है

शेअर बाजार में बहती है                       धन दौलत की नदिया
तू क्युं खडा किनारे पे                          बीत रही हैं सदिया
सही दिशा में तेज चली हैं                     Ventura की नैया
हो सव्वार …. हो सव्वार
हो सव्वार …. क्युं की भैया                  सबसे बडा रुपैया 



Wednesday, 9 October 2013

आई जगदंबेचा उदॊ



आई अंबेचा गजर ... अंबेचा गजर
आईवर खिळली ग नजर  … खिळली ग नजर

उठले भक्तांचे मोहोळ
झाला नामाचा कल्लोळ
वाजती ढोल ते गर्जुन
नाचती पैंजण रुणझुण ... पैंजण रुणझुण
… आई अंबेचा गजर

उधळूनी गुलाल आभाळी
चादर हळदीची मी ल्याली
विसरुनी मायेच्या संसारा
फुलला मनाचा पिसारा ... मनाचा पिसारा
… आई अंबेचा गजर

आला माझ्या या सासरा
हळव्या ममतेचा कोपरा
आई माझी कुमारी कुमारी
नेसली शालू ग जरतारी ... शालू ग जरतारी
… आई अंबेचा गजर

होऊनी बेभान तन्मनी
गोंधळ सोहळा अंगणी
आम्ही आईच्या सुपुत्री
गेलो रंगुनी नऊ रात्री ... रंगुनी नऊ रात्री
… आई अंबेचा गजर




Wednesday, 2 October 2013

गणपती बाप्पा मोरया

गणपती बाप्पा        मोरया
मंगलमूर्ती           मोरया

उभा समोरी          मोरया
पाठीमागे             मोरया
उजव्या बाजू           मोरया
वामांगी तो            मोरया
माथ्यावरती            मोरया
चारही बाजू            मोरया
दाही दिशांना           मोरया
बाहेरी तो             मोरया
आतमधेही            मोरया
कातही माझी          मोरया

मोरया रे मोरया       मोरया रे मोरया

दुनिया बोले          मोरया
दुनिया चाले          मोरया
दुनिया हाले           मोरया
दुनिया देखे           मोरया
जो मै बोलू           मोरया
सून ले दुनिया         मोरया
सुनना चाहु           मोरया
बोल रे दुनिया         मोरया
सारे बोलो            मोरया
जोर से बोलो         मोरया

मोरया रे मोरया       मोरया रे मोरया

माझी आई           मोरया
माझी ताई           मोरया
माझा भाई           मोरया
तातही माझा          मोरया
काका मामा           मोरया
माई मावशी           मोरया
नाथही माझा          मोरया
बाळही माझा          मोरया
सगे सोयरे           मोरया
सारी नाती           मोरया

मोरया रे मोरया       मोरया रे मोरया

मैं क्युं भुला          मोरया
याद दिला दे          मोरया
मैं तेरा हुं            मोरया
तू हैं मेरा            मोरया
मुझमे हैं तू           मोरया
तुझमे मैं हुं           मोरया
हम दोनो हैं           मोरया
तेरी माया            मोरया
मेरी काया            मोरया
मेरी छाया            मोरया
बंधन में मैं           मोरया
मुक्त करा दे          मोरया

मोरया रे मोरया       मोरया रे मोरया

नाद निनादे           मोरया
अनादि नादा          मोरया
अनंत नादा           मोरया
हे ओंकारा            मोरया
नमः शिवाया          मोरया
नादब्रह्म तू            मोरया
हरीनादा तू            मोरया
अलख निरंजन         मोरया
नाम चिरंतन          मोरया
अखंड चिंतन          मोरया
सखा निरंतर          मोरया

मोरया रे मोरया       मोरया रे मोरया
गणपती बाप्पा        मोरया 
मंगलमूर्ती           मोरया 

Saturday, 28 September 2013

माझे बाबा

काही तरी माझंच चुकलं ... नाही तर आभाळ का झुकलं ?
मातीच्या डोंगरावर ... हात पसरून का टेकल?

आभाळातच सुर्य यायचा ... अंधार सारा पळून जायचा
जिथे नजर पसरेल तिथली ... सृष्टी सारी उजळून जायचा
दिवसभर थकून जेंव्हा ... रात्री नजर जड व्हायची
आभाळ सुर्य लपवे तेंव्हा... माती गोड अंगाई गायची

आभाळाच्या डोळ्यामधून ... कधी पाऊस खाली कोसळे
सरीमागुन सरी घेऊन ...मातीमध्ये रुतून मिसळे
आभाळाच्या मायेखाली ... ऊन पाऊस चंद्र तारे
आभाळाच्या छत्राखाली ... हवे हवे मला सारे

संवाद माझा पावसाशी ... माती चंद्र-सुर्याशी
आभाळ मात्र मूकपणे ... उभे माझ्या माथ्याशी
आभाळ कधी तप्त असे ... मातीलाही तापवत असे
तेंव्हा मात्र आभाळाचा ... राग राग येत असे

अधांतरी आभाळाला ... आधार द्यायला वेळ कुणा?
अवकाशाच्या पोकळीमध्ये ... आभाळाचा एकटाच कणा
सारे आपल्या चक्रामध्ये ... मग्न होऊन फिरत होते
आभाळाचे एकटेपण ... आभाळातच झुरत होते

दिवस सर्रकन असे सरले ... कुणा काही कळले नाही
आभाळ कधी कसे थकले ... त्यालादेखील वळले नाही
आता कळते माझ्यासाठी ... आभाळ वरती तापत होतं
आमचे अबोलपण ... त्यालादेखील खुपतं होतं

माझा मी मस्त होतो ... मातीसोबत बागडत होतो
आभाळाच्या छायेखाली ... आभाळाला स्मरत नव्हतो
आता कळल माझंच चुकलं ... आभाळ असं का झुकलं ?
मातीच्या डोंगरावर ... हात पसरून का टेकल?


Monday, 16 September 2013

रं आभाळाचे


निळ्या निळ्या आकाशाला .. नवे नवे रंग हवे
ढगामागे लपुनीया .. सूर्य फेकी रंगथवे

रात्र लागता चाहूल .. चाले उलट्या पावली
रजनीचा शाम रंग .. उतरे हळूच खाली

पहाटे गुलाबी लाली .. पूर्व दिशा त्यात न्हाली
आठवून रात्र जशी .. प्रिया कुणी लाजलेली

दिन सुरु तशी लाली .. बने सोनेरी मासोळी
आभाळाने नेसली ग .. जशी साडी सोनसळी

ऐन दुपारच्या वेळी .. वाढू लागली झळाळी
वरी सुर्य पेटे तरी .. चारी दिशा नीळनिळी

उन्हे उतरू लागली .. उभी कमान आभाळी
इंद्रधनू सप्तरंगी .. सांज सांडते ओंजळी

मालवून सुर्यदीप .. तारकांची शाल ल्याली
मंद हासोनिया निशा .. चाले हलक्या पाऊली

कधी चंद्रमाची कोर .. कधी पूर्ण चंद्रबिंब
रुपेहरी चांदण्यात .. अंग भिजले ग चिंब

पाहुनिया उधळण .. जरी नयन निवले
मिटलेल्या पापणीत .. उद्या पुन्हा रंग नवे





Wednesday, 28 August 2013

मेरा अक्कलकोटवाला




डर मत मै हुं तेरे पीछे 
ऐसा मेरे कानमें बोला
मेरा अक्कलकोटवाला ..... मेरा अक्कलकोटवाला .....


तन मेरा डोला .. मन मेरा बोला
कण कण से आवाज सुनी हैं
मेरा अक्कलकोटवाला .....


कौन हैं जिसके नाम का सारी
दुनिया में हैं बोलबाला
मेरा अक्कलकोटवाला .....


रब राखा साई राम रहिम भाई
सब में हैं पर सबसे निराला
मेरा अक्कलकोटवाला .....


तेज हैं आंखे .... तेज हैं चेहरा
दिल हैं सिधा ... भोलाभाला
मेरा अक्कलकोटवाला .....

मान ले तू या .... न मान सही हैं
वो ही हैं मेरा .... रखवाला
मेरा अक्कलकोटवाला .....मेरा अक्कलकोटवाला .....

मैत्री

दोन मैतरांची  ... जुनी ही कहाणी
एक राहे गगनी ... दुजा वाहे अवनी

सागराची गाज ... एक आर्त नाद
चंद्रकला सोळा ... सागरास साद
मासी दोन दिसी ... दोघेही उन्मनी
एक राहे गगनी ... दुजा वाहे अवनी

नदी नाले यांचा ... जमवुनिया  मेळा
एक एक बुन्दा ... करोनिया गोळा
निरंतर झेप ...  फेस फुटे वदनी
एक राहे गगनी ... दुजा वाहे अवनी

घालतोय पिंगा ... चंद्रमा अतृप्त
भेट न हो शक्य ... तसा होई लुप्त
विझवुनी दीप ... आकाश सदनी
एक राहे गगनी ... दुजा वाहे अवनी

Saturday, 17 August 2013

बेसूर

मी न विसरलो, तू न विसरली, तरीही हरवले सूर
स्वप्न सांडले काजळमाथी, उरी उरे हुरहूर ||धृ||

झुळझुळणारा वारा होता ते हसणारे पाणी
तुझी न माझी संगत सोबत वारा गाई गाणी
संगतसोबत सरली, उरला डोळ्यांमधला पूर ||||

तीच नदी अन तोच किनारा बसलो त्याच ठिकाणी
तोच शशी अन तसेच तारे तशीच आहे रजनी
तसेच आहे चित्र परंतु बदलून गेला नूर ||||

विरह

पौर्णिमेची रात्र चमचम चमकती या चांदण्या
धुंद आहे रात्र तरीही चांदणे हे मंद का?

चंद्रमाचे चांदणे करी अमृताचा शिडकावा
थंड आहे किरण तरीही तप्त भासे चंद्र का?

रातराणी बहरली अन गंध प्रसवू लागली
भिजुनी गंध बरसाती अंग माझे कोरडे का?

वाहता वारा फुलवितो मनमयुराचा पिसारा
मोरपीस लहरस्पर्श आज वाटे रुक्ष का?

गीत ते अधरांवरी तरी अधर हे अबोल का?
रोज करते मी प्रतीक्षा विरह हा संपेल का?

ठेला

क्युं करते हो झगडा बोलो ||
क्युं करते हो मनमानी  ||
उसीकी रोटी उसीका पानी ||
फिर कहे को खिंचातानी ||

जितनी तेरी भूक हैं  ||
पंछी उतना दाना चुन ||
उडते उडते नाम ले उसका  ||
गाता जा तू हरी की धून  ||

उसने माना बेटा तुझको  ||
ध्यान से उसकी बात तो सुन ||
एक ही तेरी हैं पहचान  ||
उसका बेटा यही हैं गुन ||

बाकी सारा खेल हैं ||
यहा लगा एक मेला हैं ||
ढुंढ सके तो ढुंढ ले उसको ||
उसका एक ही ठेला हैं ||

छकुलं

अले माझ छकुलं दुडूदु़डू धावलं
पकडु मी गेले त्याला मला नाही गावलं ।।ध्रृ।।
             छकुल्याचे गाल .. गोरेगोरे पान
             पाणीदार डोळे .. टपोरे छान
             गालावर खळी कसं खुदकन हासलं
             पकडु मी गेले त्याला मला नाही गावलं ।।१।।
छकुल्याच्या फेट्यामधे मोरपीस खोवले
सारे त्याच्या तालावर थुईथुई नाचले
बोबड्याशा बोलावर सारं जग भाळलं
पकडु मी गेले त्याला मला नाही गावलं ।।२।।
             मुखात घालुन मुठी कशा चोखी
             छकुल्याच्या बाळलीला अशा कोटी कोटी
             मुठीमधे छकुल्याच्या सारं जग मावलं
             पकडु मी गेले त्याला मला नाही गावलं ।।३।।

पापणीत अलगद टिपले

पापणीत अलगद टिपले मुक्या भावनांना
काल तुला पाहीले मी … डाव मांडताना

ओंजळीत मोती बनला तुझा अट्टहास
ना कळले प्रीत ही बनली कधी माझा श्वास
पाहिलेस का तू मजला … श्वास कोंडताना
काल तुला पाहीले मी ......

अव्हेरिले मीच मला मी कोण दिशे जावे
परत पुन्हा मागे वळणे कुणा शक्य व्हावे
कालचक्र पिळते हृदया … उलट फिरविताना
काल तुला पाहीले मी ......

काजळी बने ही वात दिवा लावताना
काळीज हे काळे पडले प्रीत चेतताना
का जळी न मीन मी झालो … दव हे सांडताना
काल तुला पाहीले मी ......

ओसरली लाट कशी ही पुन्हा उसळू पाहे
गीत विरून वाऱ्यावरती मुका उगी राहे
स्वप्न पुन्हा सत्यामधले … स्वप्न लोचनांना
काल तुला पाहीले मी ......

Friday, 16 August 2013

गुरुपदी रमला


जो गुरु पदी रमला ... भवसागरी तरला

दैन्य, दुःख, दारिद्रय ... विळख्याने पिडला
कर्मफला भोगवटा ... कधी कुणा टळला?
जो गुरु पदी रमला ... भवसागरी तरला

रावा भीती लक्ष्मी क्षती ... रंक क्षुधे पिडला
भय हरण्या राव - रंके ...कधी कुणा स्मरला?
जो गुरु पदी रमला ... भवसागरी तरला

मदनबाण काम पीडे ... हृदयी व्याकुळला
कामक्रीडा ध्यास मनी ... कधी कुणा फळला?
जो गुरु पदी रमला ... भवसागरी तरला

मोक्ष मिळे ज्यास तया ... जन्म मृत्यू टळला
मोक्षाचा मार्ग कसा ... कधी कुणा कळला ?
जो गुरु पदी रमला ... भवसागरी तरला



माझे माहेर



कितीक दिसा नाही पहिले स्वामींच्या पाया
अक्कलकोटी जाऊनी येते माहेरी राया ||धृ||


दाटुनी येतो कंठ आठवूनी आईची माया
मोडू नका मागणे तुम्हासी विनवितसे राया ||१||


आतुर झाले नयन कधीचे स्वामी पहावया
पदर पसरुनी भीक मागते तुम्हापुढे राया ||२||


नाम अपुले कोरुनि गेला स्वामी या हृदया
प्राण दाटले कंठी मजवरी कृपा करा राया ||३||


परोपरीने हाक मारीते लेक स्वामीराया
सखा विनवितो दर्शन देवूनी धन्य करा राया ||४||




|| गुरु वंदना ||

प्रथम वंदू आदीगुरू | चल अचलांचा उद्धारु |
भजू तयासी निरंतरू | नमस्कारु ||१||

द्वितीय ज्ञानाचा सागर | सकल सुखांचे आगर |
गुरु ज्ञानदेव ईश्वर |  | नमस्कारु ||२||

तृतीय योगियांचा राजा | विवेकानंद गुरु माझा |
त्याचिया ते चरणरजा | नमस्कारु ||३||

माम जगणे सुसह्य केले | गण गण गणात बोले |
चतुर्थी ते गजाननाले | नमस्कारु ||४||

अनंत रूपे मोजू जाता | एकवटुनी झाली माता |
पंचमी आदिशक्ती आता | नमस्कारु ||५||

विठ्ठले एकरूप झाले | सदेह वैकुंठासी गेले |
षष्ठी तुकाराम आगळे | नमस्कारु ||६|| 

रामकृष्ण परमहंस | हृदयी देवीचा निवास |
सप्तमी तो ईश्वरी अंश | नमस्कारु ||७||

शिवशंकर माझी कात | शिवशंभो बाहेर आत |
अष्टमी सांब नीळकंठ | नमस्कारु ||८||

नवमी सावरली वाट | अन धरिला माझा हात |
जाहले एक नवनाथ | नमस्कारु ||९||

तारीला शैलेंद्र बावरू | ऐसे माझे सकल गुरु |
किर्ती जयांची  दिगंतरू | नमस्कारु ||१०||

स्वीकारोनी मम प्रार्थना | वदविली गुरुवंदना |
ऐषा  श्री स्वामी समर्थांना | नमस्कारु ||११||

Dedicated to "MOTHERS"


                 आई

चालता चालता तीन शब्द ... पडले माझ्या कानी
गोठून गेलो उत्तर ऐकून ... डोळा आले पाणी
पुसत होता कोणी कोणा ... "कशी असते आई"
पुसणाऱ्याला सांगत होती ... कुणी एक बाई

नवजात शिशुसाठी ... गाते अंगाई
शी काढा .. शु पुसा .. आई बनते दाई
बालपणी माई ... तशी कुमारपणी ताई
तरुणपणी शिंगे फुटताच ..... आई वाटते बाई
लहानपणी गोष्टी आणि बालपणी मस्ती
मुले तरुण होतात तेंव्हा .... आई एकटीच द्रष्टी

आई असते घरी तरी नजर खिळली दारी
सुखरूप यावी मुले ... हीच काळजी उरी
भरलेल्या घरात ... कोणी राहते का उपाशी
मुले अजून जेवली नाहीत ... आई वेडीपिशी
सारी सृष्टी मुलांमध्ये ... दृष्टी तिची अटळ
नजरेमधून ओघळ होतात ... जगामधले बदल

दिवस सरतात भराभरा ... मुले होतात मोठी
डोंगराएव्हढी माया तेंव्हा दिसू लागते छोटी
आभाळाची माया सोडून झेप घेतात नभी
परत येईल पाखरू म्हणून आई दारात उभी
दूरदेशी पाखरू ... इथे आई दुःखी कष्टी
कढत अश्रू डोळ्याआड ... शीतल राखी दृष्टी

शेवटी ती म्हणाली ... "एकच तुला सांगते"
"आई जाणण्यासाठी ... पहिले आई व्हावे लागते"
खळकन खळले पाणी ... कसे सांगू बाई 
मनात म्हटले "चुकलीस... आधी गमवावी लागते आई"





|| श्री स्वामी समर्थ - आरती ||



मूळ वडाचे कूळ सांगोनी जगता उद्धारी ||
त्या पतितपावन नरसिंहाचे ध्यान मनी मी धरी ||धृ||

कामक्रोधमदमत्सरमाया बसलो कवटाळूनी
धूडकावूनी तुज नाम न घेई म्हणे मीच ज्ञानी
अज्ञानी मी पाप करी .. परी क्रोध न मजवर धरी
त्या पतितपावन नरसिंहाचे ध्यान मनी मी धरी ||||

निर्मळ भक्ती मला जमेना कशी करू प्रार्थना
संसाराचा मोह सुटेना कशी करू अर्चना
भान हरपले भवसागरी तरी उचलुनी मजला धरी
त्या पतितपावन नरसिंहाचे ध्यान मनी मी धरी ||||

सरस्वतीची वीणा मंजुळ कवन तुझेच करी
स्वामी समर्था तुझ्या पाऊली लक्ष्मी येई घरी
गौरी हर हर हरण करी मम दुःखाचे झडकरी
त्या पतितपावन नरसिंहाचे ध्यान मनी मी धरी ||||

गौरीनंदन गण गण गणपती मोहक नृत्य करी
डम डम घण घण शंखनाद जणू अनंत वाजे ऊरी
उदे उदे जगदंबा माते हृदयी वास करी
त्या पतितपावन नरसिंहाचे ध्यान मनी मी धरी ||||