Monday, 4 November 2013

लावणी



चांदव्याची साथ
अशी मोहरली रात
थरथरली ही कात
काही उमंगना

करी मला वेडी खुळी
कलेजाचा गेला बळी
रुते गालाची ही खळी
घाव सोसना

झुळूमुळू स्पर्श झाला
टोचे लाजेचा हा भाला
ज्वर अंगाला भिडला
ज्वाला साहीना

इश्क नागीण डसली
धुंद नजर जहाली
तटतटली ही चोळी
विष भिनताना

तुझ्या मिठीत निमाले
प्रेम रसात नहाले
श्वास धुंदोनिया आले
पाते लवताना