Sunday, 25 October 2015

शोध



वाट तुझ्या घराची या डोंगरी त्या डोंगरी
शोधतिया पायाला मी लावूनिया भिंगरी

चंद्र सुर्व्या दिनराती करूनिया दिवे रे
आस तुज्या दर्सनाची आनी काय हवे रे
टेकायाला मिळो तुज्या दारची रे ओसरी
वाट तुझ्या घराची या डोंगरी त्या डोंगरी

दाही दिशी हुडकला परी कुठ गावना
नाव सारे वळिकती पत्त्या कुना ठाव ना
करायाची कशी राजा तुज्या दारी चाकरी
वाट तुझ्या घराची या डोंगरी त्या डोंगरी

नाडीच्या रे ठोक्यावरी नाव तुजे ओवले
रिदयाच्या खोक्यामंदी फोटू तुजे गावले
लपोनिया माज्यामंदी वाजवी तू बासरी
वाट तुझ्या घराची या डोंगरी त्या डोंगरी
शोधतिया पायाला मी लावूनिया भिंगरी





No comments: