पवन बेधुंद,
फुले आसमंत, तू
रे का एकला
तोडूनी
हे बन्ध होऊन निर्बंध, जवळ
घे मला
केसात
केवडी गंध
जाहला
श्वास हा मंद
या ऊरी
दाटली चोळी
देहात
पेटली होऴी
तन कष्टी
विझव रे ज्वाला
राजसा जवळ
घे मला
घायाळ
मदनबाणांनी
सरसरली
वेदना मनी
तगमग तगमग
या तनी
वणवण फिरते
उपवनी
शोधिते
कुठे तू लपला
साजणा जवळ
घे मला
No comments:
Post a Comment