Monday, 15 May 2017

स्वप्न-गंधा


चेहर्‍याची गोलाई
डोळ्यांची गहराई
नजरेतील स्निग्धता
मिलनाची अधीरता

रोखून पाहता तू
गात्रांची दाणादाण
थेट रूतून बसतो ना
ह्रदयात  मदनबाण

भिवईची तलवार
भारी धारदार
हलकीशी हालचाल
थेट काळजावर वार

काळ्याभोर डोळ्यांच्या
बदामी चंद्रज्योती
देवघरात तेवणार्‍या
मंद मंद वाती

पापण्यांची फडफड
त्यात लुकलुकत्या चांदण्या
ह्रदयाची धडधड
वाढवतात देखण्या

लाजेचा शृंगार
ल्यालेले गाल
ओठांच्या कडेला
दातांची चाल

जास्वंदी ओठांवर
लालचुटुक जिवणी
हलकेच फिरता होते
ह्रदयाची चाळणी

अशा तुझ्या अदांनी
घायाळ होऊन मी
कैद झालो कधीचा
आता तुझा गुलाम मी

No comments: