Sunday, 19 March 2017

डाव मांडू दे

तुझ्यासवे मांडू दे ना डाव नवा .. डाव नवा
तुझी आस लागली रे माझ्या जीवा .. माझ्या जीवा

असताना साथ तुझी ... जगण्याला अर्थ नवा
मन माझे वेडेपिसे ... सोबतीला तूच हवा
तुझे बोल माझ्या कानी वाजविती मधुर पावा
तुझ्यासवे मांडू दे ना डाव नवा .. डाव नवा
तुझी आस लागली रे माझ्या जीवा .. माझ्या जीवा

तुझ्यामुळे सावरला ... जीवनाचा झंजावात
मन गर्भी अंकुरली ... प्रितीची ही रुजवात
नाही कळले, घेतला तू, काळजाचा कधी ठावा
तुझ्यासवे मांडू दे ना डाव नवा .. डाव नवा
तुझी आस लागली रे माझ्या जीवा .. माझ्या जीवा

तुझ्या माझ्या प्रितीचा ... होऊ देत गवगवा
कोण किती काय बोले ... नाही तमा नाही पर्वा
माझ्या आभाळात उडे तुझ्या स्मृतींचाच थवा

No comments: