Sunday, 16 April 2017

गाणे

गंधीत होऊनी आले गाणे
मधुर स्वरांचे मधुर तराणे

भुलवून स्वरांना तू बांधले
गळ्यामधूनी हळू सोडले
मधाळ ओठी मग घोळले
श्वासांवरती स्वार होऊनी
गंधीत होऊनी आले गाणे
मधुर स्वरांचे मधुर तराणे
गंधीत होऊनी आले गाणे

कधी आरोही, अवरोही मग
कधी तान आलापीचे जग
स्वर, लय मात्रा वर्षती पग पग
त्या बरसाती चिंब न्हाऊनी
गंधीत होऊनी आले गाणे
मधुर स्वरांचे मधुर तराणे
गंधीत होऊनी आले गाणे


No comments: