ढग वाहून नेता नेता वाऱ्याला एकदा दम लागला
तो थकला, झाडाच्या सावलीत बसून पानांशी खेळू लागला
बराच वेळ झाला, ढग एका जागी उभा राहून कंटाळला
रागाने फुलू लागला,हळूहळू विस्तारत मोठा झाला
तो वाऱ्यावर गुरगुरू लागला, ..... वारा चिडला
वाऱ्याने चिडून उडी मारली, ढगाच्या पोटात ढुशी मारली
ढग कळवळला ... आक्रोश करत रडू लागला
तो खूsssप रडला आणि रडून रडून हलका झाला
पाऊसपाणी पिऊन वारा ताजातवाना झाला
रिकामी ढग वाऱ्याने क्षितिजापार नेला
ओले झाड हसत टाळ्या वाजवू लागले
त्याला जीवन मिळाले ते सळसळत नाचू लागले
No comments:
Post a Comment