Thursday, 19 November 2020

मी चकोर अन् तू चंद्रमा

स्पर्शिता आरक्त कुसुमा 
गंधल्या सार्‍या सीमा
कांती पसरे पौर्णिमा 
मी चकोर अन् तू चंद्रमा


झुळूकतो मोहरुन वारा 
पदर उडता भर्र्भरा 
स्पर्श निर्जल पत्थरा
अन् झुळझुळे खळखळ झरा
अधर-दली स्मित बिखरे
मी पतंगा तू शमा
कांती पसरे पौर्णिमा 
मी चकोर अन् तू चंद्रमा


जडावला श्वास असा
होऊनिया धुंद धुंद
झुकलेल्या पापण्यांतुन  
दीप तेवत मंद मंद 
घे पतंगा झेप आता
बाळगू नको तमा
कांती पसरे पौर्णिमा 
मी चकोर अन् तू चंद्रमा


*शैलेन्द्र*
नोव्हेंबर १९, २०२०

No comments: