का जाग आली ....
ह्रदयामधूनी तू हलकेच केलीस ...
धक् धक् ... धक् धक्
ह्रदयावरी तू हळुवार करताच ...
ठक् ठक् ... ठक् ठक्
की जाग आली .... ह्रदयामधूनी तू हलकेच केलीस ...
धक् धक् ... धक् धक्
कधी तू तुषार
कधी तू दवबिंदू
धबाबा धबाबा
कधी कोसळशी तू
कधी सागराची
गंभीर गाज
कधी निर्झराचा
खळखळता साज
अन् पाऊस बनूनी ...
भिजवून गात्रे ...
चिंबुन चिंबुन ...
चिकचिक चिकचिक
कधी तू दवबिंदू
धबाबा धबाबा
कधी कोसळशी तू
कधी सागराची
गंभीर गाज
कधी निर्झराचा
खळखळता साज
अन् पाऊस बनूनी ...
भिजवून गात्रे ...
चिंबुन चिंबुन ...
चिकचिक चिकचिक
तू ओला मृद्-गंध
कुसुमी सुगंध
मनाचा मनाशी
रेशीमबंध
कळीचा बहर
फुलाचा डवर
उमलून येतो
मनाचा मोहर
अन् स्वप्नामधुनी ...
हलकेच येशी ....
चांदण चालीने ...
लुकलुक लुकलुक
नोव्हेंबर १७, २०२०
ह्रदयावरी तू हळुवार करताच ...
No comments:
Post a Comment