जैसे न
असणे
तैसे
भासविणे ||
जैसे न
दिसणे
तैसे
दाखविणे ||
ते बोल
बोलणे
जैसे न
बोलणे ||
ते बोल
ऐकणे
जे न
ऐकविणे ||
कर्ता
कर्म करता
कर्म न
करणे ||
स्वीकारोनी कर्म
कर्म
नाकारणे ||
नाम
जपे नामी
ना "मी" जपे नामी ||
ना जपे "मी" नामी
नाम जपविणे ||
सखा
रंगे रंगी
रंगोनी
न रंगी ||
सखा रंगे रंगी
रंगोनी श्रीरंगी ||
No comments:
Post a Comment