तुझी वाट हेरून .....
वाटेवर नजर पेरून ....
कधीतरी दिवसातून ...
एकदा ....
कधीकधी अनेकदा ....
शरीराबरोबर रेंगाळत असतं
.... मन
वळशील तू ....
नजर माझी उतरेल ...
पुन्हा एकदा ...
तुझ्या डोळ्यातून ....
ह्रदयात खोलवर ....
जिथे पुन्हा घडेल ...
मला माझेच
...दर्शन
No comments:
Post a Comment