Wednesday, 1 October 2014

प्रवासी




मोदसागरी डुंबत बसले
तीन घडीचे तीन प्रवासी
तिघेही म्हणती मीच अगस्ती
पिऊनि सागरा लुटूया मस्ती
सागर मंथन करुया म्हणती
भरुन घेऊ ओंजळमोती
तीन घडीचे तीन प्रवासी
एकामागे एक चालती
या मागे तो त्या मागे हा
कोण पहिला कोण शेवटी







No comments: