Monday, 14 April 2014

|| श्री स्वामी समर्थ ||

महाविष्णू तू महादेव तू 
तू ब्रम्हा तू श्री स्वामी ||
वंदन करिती भक्त सकल तव 
कृपा वर्षवी हे स्वामी ||

तू जगदंबा तूची भवानी
तू काली तू श्रीलक्ष्मी ||
माय माउली तूची आमुची 
कृपा वर्षवी हे स्वामी ||

तू कर्ता अन तूच करविता 
तू त्राता मज सांभाळी  ||
लीन होवुनी तुला विनवितो
कृपा वर्षवी हे स्वामी ||

अनादी तू अन अनंत तरीही
आदि अंत तू या जीवनी ||
सखा म्हणे हर जन्मी तुझा मी 
कृपा वर्षवी हे स्वामी  ||


No comments: