डोळे
मिटुनी तू जागा
उठुनी
पाही जरा जगा
किती
हलविले बघा बघा
निजुनी
राही करी त्रागा ||
सखा म्हणे
माझ्या मैतरा
काळ जातसे
भराभरा
जागे व्हा रे
जराजरा
त्वरा करा रे
त्वरा करा ||
उभा
सामोरी श्रीहरी
झोपाळू
ते घरोघरी
सखा
विनवितो परोपरी
म्हणा
मुखाने हरी हरी ||
No comments:
Post a Comment